अहमदनगर मध्ये सराफाच्या डोळ्यात मिरची टाकून नऊ लाखांना लुटले ; चार जणांना बेड्या


माय अहमदनगर वेब टीम
रस्ता विचारण्याच्या बहाण्याने डोळ्यात मिरची पूड टाकून सराफ व्यावसायिकास 7 लाख 90 हजार 778 रूपयांना लुटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. या कारवाईत निखिल शशिकांत रणनवरे (वय- 21, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपर), सोहेल जुबेर शेख (वय 21), आवेज उर्फ बाबा शेख (वय 23, दोघे रा. फातेमा सेासायटी, श्रीरामपूर), मतीन गुलाब पठाण (वय 20, रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा) यांना अटक केली आहे.

निखिल बाळासाहेब आंबिलवादे (रा. खेडले परमानंद, ता.नेवासा) हे त्यांचे गुरूकृपा ज्वेलर्स दुकानातील 7 लाख 90 हजार रूपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने घेऊन पानेगाव ते खेडले परमानंद रोडने पानेगाव शिवारातून जात असताना मोटारसायकलवरील तिघांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग चोरून नेली. ही घटना 21 जानेवारीला सायंकाळी 5.15 वाजता घडली. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा तपासा सुरु असताना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली असून यातील शाहरूख सांडु सय्यद (रा. चाँदनगर, बेलापुर, ता. श्रीरामपूर), गौरव बारकू अवसरमल (रा. टाकळीभान, श्रीरामपूर), प्रकाश उर्फ भावड्या भिमराव रणनवरे (रा. टाकळीभान, श्रीरामपूर), अलिशा अजिज शेख (रा. संजयनगर, श्रीरामपूर), विजय उर्फ बब्बु रामकृष्ण देडगावकर (रा. कोल्हार, ता. राहाता) हे फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विजय देडगावकर याच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. या बदल्यात देडगावकर यांनी 5 लाख 20 हजार रूपये देण्याचे कबूल केले होते. त्यापैकी काही रक्कम दिली, अशी माहिती पोलिसांना त्यांनी दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हे.कॉ. मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, रवींद्र कर्डिले, विजय वेठेकर, मन्सूर सय्यद, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, पो.कॉ. रणजित जाधव, प्रकाश वाघ, शिवाजी ढाकणे, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, चालक सचिन कोळेकर, संतोष लोंढे, संदीप घोडके, राहुल सोळुंके, महिला पोलीस सोनाली साठे यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post