निंबळक बायपास रस्त्यावरील खूण प्रकरणाचा तपास लागला ; टोळी जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - निबंळक बायपास येथे दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून जेरबंद केली. त्याच्या कडून ७३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. दिलीप अशोक मुंढे (रा.सोनहिवरा, ता.परळी, जि.बीड ह.रा.इंद्रायणीनगर, सेक्टर नं.३, बिल्डिंग नं.५३, भोसरी, ता.हवेली, जि.पुणे), रोहित उर्फ दाद्या शहाजी बनसोडे ( रा.शिरसागरनगर, ढवळस, ता.माढा, जि.सोलापूर,), महेश मोहन शिंदे (रा.जगदाळे नगर, कुर्डुवाडी, ता.माढा, जि.सोलापूर), ज्ञानेश्वर उर्फ सोनू विष्णू राऊत (सूतार आळी, ढवळस, ता.माढा, जि.सोलापूर), शिवाजी धनाजी पाटील (रा.पाटील वस्ती, उजनी, सोलापूर), शाहीद इस्माईल शेख (रा.व

डजी, ता.वाशी जि.उस्मानाबाद, ह.रा.गंधर्वनगर, मोशी, ता.हावेली जि.पुणे) अशी पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. या आरोपींना दि.१८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.

31 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नवनाथ वलवे (रा. सारोळा कासार, ता. नगर) यांचा खून झाला होता. वलवे यांच्या खुनानंतर 80 लाख रुपयांची दूध पावडर असलेली मालट्रक गायब होती. त्यामुळे दूधपावडर तस्करीतून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. पुणे, सोलापूर व मुंबई येथून सहा संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्यांनी हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधितांना अटक करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post