माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पोलिस रेझिंग डे निमित्त नगर तालुका पोलिस स्टेशनच्या ठाणे अंमलदार पदाचा पदभार नगर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा लोकतचे पत्रकार योगेश गुंड यांनी घेतला होता. दरम्यान, तालुक्यातील अकोळनेर येथून आलेल्या तक्रारीची दखल घेत तात्काळ फिर्याद दाखल करुन घेतली.
पोलिस रेझिंग डे निमित्त गेल्या आठवडाभरापासून विविध कार्यक्रांचे आयोजन करण्यात आले आहे. रेझिंग डे निमित्त नगर तालुका पत्रकार संघाच्यावतीने तालुका पोलिस स्टेशनला भेट दिली. यावेळी पोलिस निरीक्षक राजपुत यांनी तालुक्यातील पत्रकारांचे स्वागत केले. दरम्यान, राजपुत म्हणाले की, तालुका पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारपासून तालुक्यातील पत्रकारांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तालुक्यातील गुन्हेगारी संपविण्यासाठी प्रयत्न असून याकाी पत्रकारांनी सहकार्य करावे. नगर तालुक्यात भाऊबंदकी, जीनीचे वाद यासारखे गुन्हे मोठ्या प्राणात आहेत. यावेळी नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र निकम, लहूकुमार चोभे, सुनील चोभे, नागेश सोनवणे, अजिनाथ शिंदे, दत्ता इंगळे, शशिकांत पवार, अविनाश निमसे उपस्थित होते. पोलिस रायझिंग डे सप्ताह निमित्त नगर तालुका पत्रकार संघाच्या वतीने नगर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपुत यांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment