बालिकाश्रम रोडला पर्याय रस्ता म्हणून सिनानदी लगत रस्ता निर्माण करणार - महापौर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- पक्षीय राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांनी आपआपसातील मतभेद विसरुन सोबत राहून विकासकामे करावी. नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आपण सर्व जण सोबत राहू. प्र.क्र.८ मध्ये चारही नगरसेवक शिवसेना पक्षाचे आहेत.तरीही आम्ही सर्व पक्षाचे नगरसेवक विकास कामांसाठी एक आहोत. प्र.क्र.८ मध्ये 3 कोटी रुपयाची विकासकामे मंजूर आहे. माजी महापौर नगरसेवक अनिल बोरुडे हे नेहमीच विकासकामासाठी प्रयत्नशील असतात. बालिकाश्रमरोडला पर्याय रस्ता म्हणून सिनानदी लगत रस्ता निर्माण करणार आहे. या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. तरी नागरिकांनीही या कामासाठी सहकार्य करावे असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

प्र.क्र.८ मध्ये माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या प्रयत्नातून सिनानदी वरील पुलाच्या कामांचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, माजी नगरसेवक दगडू मामा पवार,संजय शेंडगे, राहूल वाकळे, प्रदिप बोरुडे, नंदू बोरुडे, गोरख लक्ष्मण शिंदे, भैय्या रोहोकले, अक्षय बोरुडे, संजय बोरुडे, किशोर वाघ, शिवाजी बोरुडे, मारुती शिंदे, अभिजित बोरुडे, जालिंदर बोरुडे, सोनू बोरुडे, बाबा मुळे, ज्ञानेश्वर बोरुडे, अनंत बोरुडे, काशिनाथ रोहोकले, आप्पा कदम, मुकुंद ताठे, शिवाजी कदम, शिरीष कानडे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की, प्र.क्र.८ मधील सर्व भागामध्ये सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच ही कामे प्रभागामध्ये सुरू होणार आहे. प्रभागाचा कायापालट विकासकामातून करणार आहे. आम्ही चारही नगरसेवक एकत्र राहून काम करत आहे. पावसाळ्यामध्ये पुरामुळे सिनानदीवरील पूल वाहून गेल्यामुळे बोल्हेगाव, नालेगाव व बोरुडेमळा शिवारात शेती कामासाठी जाण्यासाठी पुल पुन्हा नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती.

मनपाच्या माध्यमातून हे काम आता सुरू झाले आहे. प्रभागाचा समतोल विकास हाच ध्यास आहे. प्रभागातील चारही नगरसेवक एका विचाराने काम करीत असल्यामुळे प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर झाला आहे. आम्ही कधीही विकासकामाचे राजकारण आणत नाही.असेही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post