महिलांनी उत्पादीत केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे - उपमहापौर मालनताई ढोणे
सर्वज्ञानी महिला विकास मंच तर्फे उत्पादित वस्तुचे प्रदर्शन व विक्री
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महिला आता सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या कामांचा ठसा उमटवत आहेत. महिलांनी उत्पादीत केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे. यासाठी मनपा सहकार्य करेल. महिलांचे संघटन हे विकासाचे पहिले पाऊल आहे. महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणात झाल्यास चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होते. सर्वज्ञानी महिला विकास मंचच्या वतीने महिलांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून दिली. महिलांनी योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे. महिलांच्या हाताला काम दिल्यास त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत होऊ शकते. महिलांचे उद्योग व्यवसायामध्ये मनोबल वाढविण्यासाठी अशा उपक्रमाची खरी गरज आहे, असे प्रतिपादन उपमहापौर मालनताई ढोणे यांनी केले.
सर्वज्ञानी महिला विकास मंचच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालय येथे वस्तुचे प्रदर्शन व विक्री, महिला महोत्सव व विविध स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर मालनताई ढोणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. शामा मंत्री, संगीततज्ज्ञ अनुराधा सुरसे, संस्थापक आरती काळपुंड, आयोजक अपुर्णा सुरवसे, आदींसह महिला मोठ्या सं‘येने उपस्थित होत्या.
यावेळी आरती काळपुंड म्हणाल्या की, महिलांचा समजामध्ये योग्य सन्मान व्हावा यासाठी महिलांना एकत्रित आणण्याचे काम केले गेले. सर्वज्ञानी महिला विकास मंचाने महिलांना बाजारपेठ निर्माण करुन दिली. महिलांच्या हाताला घरबसल्या काम मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. प्लॅस्टिकमुक्ती व्हावी यासाठी सर्वज्ञानी महिला विकास मंचच्या वतीने कापडी पिशव्या बनविण्याचे काम सुरू केले आहे. महिलांच्या एकत्रीतपणामुळे आम्ही समाजामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम करत आहे.
अपुर्वा सुरवसे म्हणाल्या की, आज कोहिनूर मंगल कार्यालय येथे महिलांनी हाताने तयार केलेल्या वस्तुचे प्रदर्शन व विक्री, महिला महोत्सव तसेच नगर होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले. हळदी-कुंकू, फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या संकल्पनेतून विविध वस्तू तयार करण्याचे काम केले जाते. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या एकीच्या बळावर आपण समाजामध्ये चांगले काम उभे करू शकतो. यावेळी महिलांना बनविलेल्या वस्तुचे विविध स्टॉल्स्लावण्यात आले होते. यावेळी समाजामध्ये विद्युतबचत, पाणीबचत, वाहतूक नियमन, प्लास्टीक मुक्ती संदर्भात जनजागतीचे स्टॉल्स्लावले होते. प्लास्टीकमुक्तीसाठी कापडी पिशवीचा वापर करा असा संदेश देण्यात आला होता.
Post a Comment