आ. निलेश लंके यांच्या जनता दरबारात समस्यांचा पाऊस ; अनेकांच्या तक्रारी निकाली


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी जनतेच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या उद्देश्याने येथील द्वारका लॉन मध्ये आयोजित केलेल्या जनता दरबारात मतदार संघातील नगर तालुक्यातील जनतेने धाव घेत आपल्या तक्रारी नोंदविल्या. या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी नगर तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकिय कार्यालयातील यंत्रणेचा आधिकारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमात आमदार लंके यांनी स्वत: आलेल्या तक्रार अर्जाची सुनावणी घेत प्रत्येक तक्रारदार व्यक्ति व संबधित विभागाचे अधिकारी यांना मंचावर बोलवुन तक्रारी बाबत दोन्हीं बाजुचे म्हणणे एेकुन घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठवडा पंधरवडा अशी मुदत काम पूर्ण करण्याची ताकीत दिली. तसेच काम पूर्ण केल्यानंतर त्यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क करुन कळविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविली. जनतेची प्रलंबित कामे मार्गी लागले की नाही याचा आढावा घेण्यासाठी यापुढेही जनता दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, तहसिलदार उमेश पाटील, निवासी नायब तहसीलदार अभिजीत बारवकर, तालुका कृषी अधिकार बाळासाहेब नितनवरे, अग्रणी जिल्हा प्रबंधक संदिप वालावलकर, उपनिबंधक सहकारी संस्था के आर रतनाळे, मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर, अहमदनगर मनपाचे उप आयुक्त प्रदीप पगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

जनता दरबारात प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावित तहसिलदार उमेश पाटील यांनी केले.

यावेळी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील चास गट व निंबळक गटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post