सीएए-एनआरसी विरोधातील भारत बंदला हिंसक वळण


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सीएए कायदा व एनआरसीविरोधात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला विदर्भात गालबोट लागले. धुळ्यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसादासह बंद शांततेत पार पडला.

अकोला, अमरावती : भारत बंददरम्यान बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली नाहीत. नंतर युवकांनी माेठ्या संख्येने धाव घेत ही दुकाने बंद करण्यास भाग पाडले. पातूर व बाळापूरमध्ये दगडफेकीच्या घटनेत सहा जण जखमी झाले. तर शेगाव येथे दगडफेकीत श्याम राठी जखमी झाले.

बंददरम्यान शहरातील मुख्य इर्विन चौकात रास्ता रोको करण्यात आले. त्यामुळे येथील वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती. बंददरम्यान काही दुकाने बंद होत असल्याचे बघून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याच्याही घटना घडल्या.बडनेऱ्यासह शहरातही बंदमुळे शाळांना सुटी देण्यात आली होती. तसेच येथेही आंदोलकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली. त्यामुळे अमरावती-अकोला मार्गावरील वाहतूक सकाळी सुमारे १ तास खोळंबली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post