मेहरबाबांच्या अमरतिथीला ६० हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: ' बिगिन दि बिगिन' ही धून पावणे बारा वा वाजवण्यात आली, नंतर नगर सेंटरने मेहेरधून म्हणण्यात आली दु १२ वा मौनास सुरुवात झाली. यावेळी सर्वत्र शांतता होती. टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होते .१५ मिनिटानंतर 'अवतार मेहेर बाबा कि जय' च्या जयघोषात मौन सोडण्यात आले .यावेळी टेकडीवर सुमारे ६० हजाराच्यावर भाविक होते.
अवतार मेहेरबाबाच्या समाधी स्थळी ५० वी अमरतिथी सोहळ्यात आज ३१ जानेला बाबांनी देहत्याग केला. त्यावेळेस दु १२ वा दौंड रोडवरील मेहराबाद (अरणगाव) येथे सुमारे ५५ हजार भाविकाचे मौन पाळले, तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले.
कालपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप आहे. त्याव्यतिरिक्त जेथे मिळेल भाविक बसून होते दुपारी ११. ३० ला चेअरमन श्रीधर केळकर यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले, श्री थाडे बंधू आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते, अवतार मेहेरबाबांनी मौनास सुरवात केल्यावर शेवटपर्यंत मौन पाळले म्हणून आज हे महामौन पाळले जाते.
दि १ फेबु रोजी सकाळी ७ ते दु १ पर्यंत प्रेममिलन कार्यक्रम होईल नंतर आरती प्रार्थना होईन व कार्यक्रमाची सांगत होईल येथे ३ दिवस दर्शनासाठी टोकन पद्धत वापरली जाते. त्यामुळे गडबड, गोंधळ होण्याचा संभव नसतो एका वेळेस सहाशे लोकांना टोकन दिले जाते. त्याचा नंबर प्रमाणे दर्शनास सोडले जाते त्याची ही वेळ आधी सांगितली जाते. त्याप्रमाणे भाविक रांगेत उभे राहतात.त्याच्यासाठी दर्शनरांग व त्यावरील मंडप, पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे .
Post a Comment