'तान्हाजी द अनसंग वॉरिअर'चा मराठी टीजर रिलीज, उद्या येणार ट्रेलर



माय अहमदनगर वेब टीम
एंटरटेन्मेंट डेस्क -  शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप भारतीय इतिहासावर आजही कायम असून आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे! दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरीयर' हा चित्रपट हिंदीसह मराठी वर्जनमध्ये प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.अभिनेता अजय देवगणने नुकताच मराठी चित्रपटाचा 15 सेकंदांचा टीजर रिलीज केला आहे.

इन्स्टाग्रामवरटीजर रिलीज करुन ''गड आला पण सिंह गेला. Witness this epic journey in Marathi! #TanhajiMarathiTrailer out tomorrow. #TanhajiTheUnsungWarrior'' हे कॅप्शन दिले आहे. टीजरमध्ये अजय देवगणची झलक दिसत आहे. उद्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post