' या ' विधेयकाला मोदी सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी; दुसऱ्यांदा संसदेत मांडणार
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व विधेयक 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कॅबिनेटने बुधवारी मंजुरी दिली. यातून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या बिगर मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग सोपा होणार आहे. हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिस्ती धर्माच्या शेजारील देशाच्या नागरिकांना सहज नागरिकत्व देणारे हे विधेयक याच अधिवेशनात सादर केले जाऊ शकते.
यापूर्वी मोदी सरकारने जानेवारीमध्ये लोकसभेत हे विधेयक मंजूर केले होते. परंतु, विरोधी पक्षांच्या संतापानंतर राज्यसभेत मंजुरी मिळू शकली नाही. मोदी सरकार धर्माच्या आधारे भेदभाव करून नागरिकत्व विधेयक मंजूर करू पाहत आहे. असा आरोप विरोधकांनी केला. याच विधेयकावरून आसम आणि ईशान्य भारतात यावर आक्षेप घेण्यात आले. विविध शहरांमध्ये या विधेयकाच्या विरोधात निदर्शने देखील करण्यात आली होती.
Post a Comment