नोव्हेंबरअखेर राज्यात 9 लाख टन उसाचे गाळप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राज्यातील 20 सहकारी व 23 खासगी अशा 43 साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरुवात केली असून 30 नोव्हेंबर 2019 अखेर केवळ 9 लाख 4 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 6 लाख 67 हजार क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.
यंदाच्या ऊस गाळप हंगाम 2019-20 करिता 162 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी आजपर्यंत साखर आयुक्तालयाने 125 कारखान्यांना गाळप परवाना जारी केलेले आहेत.
महाराष्ट्रात साखर कारखान्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून दि. 22 नांव्हेंबरपासून हंगाम सुरु करण्याची अनुमती मिळाल्यानंतर ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे. गळीत हंगाम 2018-19 मध्ये महाराष्ट्रात एकूण 195 साखर कारखान्यांनी गाळपामध्ये भाग घेतला होता आणि 951.79 लाख टन उसाचे गाळप करून 11.26 टक्क्याची रिकव्हरी दराप्रमाणे 107.19 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. या हंगामात, महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि दुष्काळ यामुळे साखरेचे उत्पादन कमी होण्याची संभावना आहे.
Post a Comment