माय अहमदनगर वेब टीम
किचनमध्ये वापरत असलेलं टॉवेलमुळे फूड पॉयसनिंग होऊ शकतं असं एका संशोधनातून समोर आलंय. संशोधनांच्या सांगण्यानुसार, किचनमध्ये असणारं टॉवेल जर अस्वच्छ असेल तर त्यावर पॅथोजेन या विषाणूची वाढ होते. आणि हा पॅथोजेन विषाणू फूड पॉयसनिंगसाठी कारणीभूत ठरतो.
तुम्ही किचनमध्ये वापरत असलेलं टॉवेल स्वच्छ आहे का? कारण जर तुमच्या किचनमधील टॉवेल अस्वच्छ असेल तर तुम्हाला फूड पॉयसनिंग म्हणजेच अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे. नुकत्याचं केलेल्या एका संशोधनानुसार, किचनमध्ये असणारं टॉवेल जर अस्वच्छ असेल तर त्यावर पॅथोजेन या विषाणूची वाढ होते. आणि हा पॅथोजेन विषाणू फूड पॉयसनिंगसाठी कारणीभूत ठरतो.
मॉरिशस विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, किचनमधील टॉवेलवर बॅक्टेरिया वाढण्यास अनेक घट कारणीभूत ठरू शकतात. जसं की कुटुंबातील सदस्य, अनेकांनी एकाच टॉवेलचा वापर करणं, अस्वच्छता इत्यादी.
किचनमधील टॉवेल हे शक्यतो हात पुसायला, गरम भांडं उचल्यासाठी, ओलं भांडं पुसण्यासाठी वापर होतो. टॉवेलचा असा वापर करत असताना त्यावर बॅक्टेरिया जमा होऊन ते वाढण्याची शक्यता असते.
मॉरिशय विद्यापीठातील हेल्थ सायन्स विभागाच्या अधिकारी म्हणाल्या की, "आम्ही केलेल्या संशोधनातून असं समोरं आलंय की, कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि अस्वच्छता यांचा परिणाम किचनमधील टॉवेलवर जंतू निर्माण होण्यास होतो. त्याशिवाय आहार, ओलसर टॉवेल या गोष्टींमुळे टॉवेलवर पॅथोजेन बॅक्टेरिया जमा होतो. पॅथोजेन बॅक्टेरिया हा फूड पॉयसनिंग होण्यासाठी कारणीभूत ठरतो."
संशोधकांच्या सांगण्यानुसार, या अभ्यासासाठी १ महिना वापरण्यात आलेले किचनमधील १०० टॉवेलांचा वापर करण्यात आलाय. त्यापैकी ४९ टक्के टॉवेलांवर शरीरासाठी घातक असणारे बॅक्टेरिया आढळले. टॉवेल ओलसर असणं, नॉन-वेज जेवणं शिजवताना टॉवेलचा वापर आणि ओसलर टॉवेल हे प्रमुख घटक टॉवेलवर बॅक्टेरियाची वाढ होण्यासाठी कारणीभूत होते.
त्या पुढे म्हणाल्या की, "नॉन-वेज जेवणं शिजवताना टॉवेलचा योग्यरित्या वापर न करणं किंवा त्यानंतर ते स्वच्छ न करणं हे कारणंही बॅक्टेरिया वाढीसाठी पुरेसं आहे. अनेकांनी एकट टॉवेल वापरणं किंवा ओलसर टॉवेल वापरणं टाळलं पाहिजे. शिवाय कुटुंबात व्यक्तींची संख्या अधिक असेल तर किचनमध्ये योग्य ती स्वच्छता पाळणं गरजेचं आहे."
यांसदर्भात खारघरच्या मित्रा रूग्णालयातील पोटविकारतज्ज्ञ म्हणाले की, "मुळात किचनमध्ये वापरात येणारं टॉवेल हे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. जर ते अस्वच्छ असेल आणि त्याचा वापर घरातील व्यक्तींनी केला तर त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही."
Post a Comment