67 व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी जिल्हा संघाची निवड
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- चिपळुण येथे 67 व्या राज्य अजिंक्यपद कब्बडी निवड चाचणी साठी अहमदनगर जिल्हा पुरूष व महिला संघाची निवड करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष दादा कळमकर, उपाध्यक्ष जयंत वाघ, सचिव प्रा. शशिकांत गाडे, सहसचिव प्रा. सुनिल जाधव यांनी चिपळूण येथे ता. 19 पासून होणाऱ्या 67 व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी साठी नगर जिल्ह्याचा पुरूष व महिला संघाची निवड केली. यासाठी रविवार ता. 8 रोजी सनफार्मा विद्यालयाच्या मैदानावर पुरूष तर राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या मैदानावर महिला संघाची निवड चाचणी स्पर्धी गेण्यात आला. यातून 20 पुरूष व 20 महिला खेळाडूंची निवड करून या दोन्ही संघाचे सराव शिबीर न्यु आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आले. निवड चाचणी सदस्य शिवाजी वाबळे, कैलास पठारे, कैलास बोरूडे, प्रशांत पवळ, शंतनू पांडव यांनी या शिबारातून 12 अंतीम पुरूष व महिला खेळाडूंची राज्य निवड चाचणी संघाची निवड केली. या निवड सदस्य समितीस कब्बडी असोशिएशनचे सदस्य प्रा. सुधाकर सुंबे,प्रा. संजय अनभूले, प्रा. बळीराम सातपुते, हौशीराम गोर्डे यांनी सहाय्य केले.
राज्य निवड चाचणी साठी निवड झालेला पुरूष संघ- धनंजय आसने (कर्णघार ) शंकर गवई (उपकर्णधार) वैभव शंदे, गणेश शिंदे, राहुल धनवटे, संभाजी वाबळे, हुजेफ सय्यद, आशिष यादव, राहुल आगळे, अजय ठोकळे, किरण मोरकर, अदेश मोडक, राखीव - युसूफ सेक,सागर आगळ
Post a Comment