हिट-चाट इन्टिमेट सीन करताना हात- पाय कापतात



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- सिनेमात इन्टिमेट सीन देणं ही फार सामान्य गोष्ट झाली आहे. कथेच्या गरजेनुसार सर्वच अभिनेत्यांनी इन्टिमेट सीन दिले आहेत. पण या सगळ्यात असेही काही स्टार आहेत ज्यांना इन्टिमेट सीन देताना सर्वात जास्त टेन्शन येतं. बॉलिवूड अभिनेता आणि दाक्षिणात्य स्टार दुलकर सलमानने असे सीन शूट करताना त्याचे हात पाय कापत असल्याचं मान्य केलं. तो म्हणाला की, कॅमेर्‍यासमोर आपल्या मनातली धाकधूक तो मोठ्या शिताफीने लपवतो.

दुलकर सलमान नुकताच नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा शोमध्ये गेला होता. या मुलाखतीत दुलकरने स्वतःशी निगडीत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की, इंटिमेट सीनवेळी तो फार अस्वस्थ होतो. एवढंच नाही तर त्याचे हात- पायही कापू लागतात. सलमान म्हणाला की, माझी कोस्टर काय विचार करत असेल याचा मी नेहमी विचार करतो. मला यातून बाहेर पडायचं आहे हे तिला कळतं असेल का… मग वाटतं मी पूर्ण नग्न आहे आणि ती मी काय आहे ते पाहू शकते.. असे एक ना अनेक विचार माझ्या मनात सतत येत राहतात.मदनगर वेब टीम

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post