हस्तांतरविरोधात कर्मचार्यांचे आंदोलन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - हिवताप योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरास विरोध दर्शविण्यासाठी विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय हिवताप योजना हस्तांतरण विरोधी समन्वय महाराष्ट्र राज्य समितीने घेतला असून या निर्णयाप्रमाणे समितीच्या जिल्हा शाखेने जिल्ह्यातील सर्व कर्मचार्यांनी 18 डिसेंबरच्या नागपूर मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष एस. आर. सावंत यांनी केले आहे. जिल्ह्यातील शेकडो कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि.13) नगर जिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केली.
यावेळी मध्यवर्ती संघटनेचे व्ही .बी. बनकर, समितीचे जिल्हा निमंत्रक सुनील मुंगसे, पुरुषोत्तम आडेप, जिल्हा कार्याध्यक्ष डी. ए. पोळ, जिल्हाध्यक्ष बी. पी. नवगिरे, सल्लागार टी. डी. कोळपकर, सरचिटणीस श्री.तळेकर, डॉ. मुकुंद शिंदे, किसन भिंगारदिवे आदिंनी समयोचित भाषणे करुन हस्तांतरास विरोध दर्शविला. याप्रसंगी 91 कर्मचार्यांनी धरणे आंदोलनात भाग घेतला. समितीच्यावतीने जिल्हा हिवताप अधिकारी यांना देण्यात आला.
दि.18 डिसेंबर रोजी विधीमंडळाचे नागपूर येथील अधिवेशनावर प्रचंड विराट मोर्चा निघणार असून नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. या मोर्चाची राज्य शासनाने दखल न घेतल्यास दि. 26 डिसेंबरपासून राज्यात काम बंद आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला. राज्य शासनाच्या हिवताप कार्यालयाचे जिल्हा परिषदेत हस्तांतर करण्याचा निर्णय 22 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून घेत त्या विरोधात राज्यातील हिवताप कर्मचार्यांनी संघटित होत या परिपत्रकाला विरोध दर्शविला. प्रथम 2 डिसेंबर निवेदन देऊन परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. 18 डिसेंबर रोजी मोर्चा आणि त्यानंतर 26 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन ‘शेंडी तुटो नाहीतर पारंबी’ संघटना मागे जाणार नाही असाच निर्धार यावेळी अनेक वक्त्यांनी केला.
कर्मचार्यांच्या अस्तित्त्वाची लढाई असून जि.प. मध्ये हस्तांतरानंतर कर्मचार्यांची मिनिस्ट्री, प्रमोशन, पेन्शन संदर्भात दुय्यम निर्णय घेतील, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. जि.प.ची अवस्था दयनीय आहे. त्यात आपणाला दुय्यम स्थान मिळाल्याने आपले अस्तित्व संपणार आहे या विरोधात लढण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही असे यावेळी सांगण्यात आले. कर्मचार्यांचा वाढता असंतोष असून नागपूर मोर्चा तो स्पष्ट व्हावा, असे आवाहन जिल्हा निमंत्रक पुरुषोत्तम आडेप यांनी केले
Post a Comment