वजन कमी करण्यासोबतच अनेक आजारांवर गुणकारी आहे टोमॅटो
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - टोमॅटोशिवाय कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण भाजी म्हणूनच करतो, पण खरं तर हे एक फळ आहे. लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असते, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहे. वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. खाण्याशिवाय वजन कमी करण्यामध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे. जाणून घ्या सहज उपलब्ध असणाऱ्या टोमॅटोचे फायदे.
टोमॅटो चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटिक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन केचा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटॅमिन्स आरोग्यासाठी चांगली मानली जातात. व्हिटॅमिन ए ची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसेच टोमॅटो कॅल्शियम, आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणही आढळतात, जे कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.
वजन कमी करतो टोमॅटो : टोमॅटोचे सेवन वाढत्या वजनाला आटोक्यात आणू शकते. खरं तर यामध्ये खूप कमी प्रमाणात चरबीसोबतच जीरो काेलेस्टेरॉल असते, जे वजन वाढू देत नाही. टोमॅटोमधील भरपूर पाणी आणि फायबरमुळे विना कॅलरीज पोट भरण्यास मदत होते. त्यामुळे भूक कमी लागते. वजन कमी करण्याबाबत विचार करत असाल तर टोमॅटोचे नियमित सेवन सुरू करा.
कॅन्सरपासून बचाव करतो टोमॅटो : टोमॅटोच्या औषधीय गुणांमुळे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासूनही बचाव होतो. टोमॅटोमध्ये लायकोपीन नामक घटक भरपूर प्रमाणात आढळतो, जो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर रोखण्यास फायदेशीर आहे. कॅन्सर कमी करण्याऱ्या लायकोपीन या तत्त्वाशिवाय टोमॅटोमध्ये नियासीन, व्हिटॅमीन बी 6, पोटॅशियम यांसारखी तत्त्वही असतात. ही सर्व तत्त्व हृदयासाठी फायदेशीर मानली जातात. सर्वेक्षणानुसार, नियमितपणे आठवडाभर 10 टोमॅटोचे सेवन केल्यास कॅन्सर होण्याची शक्यता जवळपास ४५ टक्क्यांनी कमी होते. पुरुषांनी रोज टोमॅटो खाल्ला तर प्रोस्टेटच्या कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. एवढेच नाहीतर ज्या लोकांना ट्यूमर आहे, त्यांचा ट्यूमर कमी होण्यास आणि ट्यूमरची वाढ थांबण्यासही टोमॅटोची मदत होते. तर महिलांना याचा फायदा सर्वात जास्त होतो. पोटाचा कॅन्सर टाळायचा असेल तर रोज सॅलडच्या रूपात टोमॅटो खा.
टोमॅटो खाण्याच्या पद्धती रोजच्या भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर : प्रत्येकाच्या स्वयंपकघरात टोमॅटो हा असतोच. याशिवाय कोणतीही भाजी अपूर्ण आहे. प्रत्येक भाजी आणि आमटीची चव वाढवण्यात टोमॅटोचा सर्रास वापर होतो. प्रत्येक भाजीच्या वाटणासाठी कांदा, लसूण, आलं आणि मसाल्यांसोबत टोमॅटोचा वापर करायलाच हवा. यामुळे भाजीची चव दुपटीने वाढते आणि रंगही छान येतो.
टोमॅटोचे फायदे हाडांच्या बळकटीसाठी : टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम आढळते, ही दोन्ही तत्त्वे हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरुस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसेच टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करते.
Post a Comment