अंगावर शहारा आणतो दीपिका पदुकोणच्या 'छपाक'चा ट्रेलर, या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क - अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या छपाक या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका वठवली आहे. ट्रेलरमध्ये दीपिका बघून क्षणभर ती दीपिकाच आहे, यावर विश्वास बसत नाही. चित्रपटात तिने मालती नावाचे पात्र साकारले आहे. अॅसिड हल्ला झाल्यानंतर स्वतःचा चेहरा आरशात बघता मालतीला होणा-या वेदना बघून अंगावर शहारा उभा राहतो.
मेघना गुलजार यांचे वास्तववादी दिग्दर्शन ही या ट्रेलरची जमेची बाजू असल्याचे दिसून येते. चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मस्सी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'छपाक' पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शितहोणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी दीपिकाचा वाढदिवस असतो.
कोण आहे लक्ष्मी अगरवाल...
लक्ष्मी अगरवाल ही दिल्लीतील एका सामान्य कुटुंबातील मुलगी. 2005 साली ती 15 वर्षांची असताना एका 32 वर्षीय पुरुषाने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले होते. हा भयानक हल्ला होऊन देखील तिने कठीण परिस्थतिशी चार हात करत अॅसिड हल्यातील पीडीतांसाठी काम करण्याचे ठरवले. ‘स्टॉप सेल एसिड’ची ती संस्थापक आहे.
Post a Comment