बलात्कार घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च ; आरोपींना फाशीची मागणी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - हैदराबाद येथिल युवतीवर सामुदायिक बलात्कार करुन त्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ मोची गल्ली व्यापारी असोसिएशन, अहमदनगर सोशल क्लब व विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने कापड बाजार येथून सोमवारी (दि.2 डिसेंबर) रात्री कॅन्डल मार्च काढण्यात आला. त्या
 पिडीत युवतीला श्रध्दांजली वाहून सदर प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरीत फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

मोची गल्ली येथून निघालेल्या कॅन्डल मार्चचा समारोप कापड बाजार येथील चौकात झाला. देशात बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्याने हे प्रकरण वारंवार घडत आहे. निर्भया, आसिफा ते  या प्रकरणाने संपुर्ण भारताचे मन हेळावले आहे. महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून, याबाबत कठोर कायदा करुन आरोपींना तातडीने फाशी झाल्यास याची पुनरावृत्ती होणार नसल्याची भावना व्यापार्‍यांनी व्यक्त केली. तर बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्ली व्यापारी असो.चे अध्यक्ष मन्सूर शेख, नईम सरदार, हामजा चुडीवाला, वाजिद सय्यद, निरज काबरा, संतोष गोयल, योगेश बेद्रे, अन्सार पठाण, अकलाख शेख, बाळू चोपडा, सद्दाम चुडीवाला, पंकज राठोड, इकराम तांबटकर, बॉबी सरदार, नविद शेख, सिद्दीक तांबोली, शाहरुख शेख, सकिन सय्यद, मोहसीन शेख, दानियल शेख, अली बागवान, किशोर नारंग, फैय्याज शेख, शरद गोयल, गणेश नांगरे आदी व्यापार्‍यांसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मन्सूर शेख म्हणाले की, मानवतेला काळीमा फासणारी घटना हैदराबाद येथे घडली आहे. या प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी आरोपींना भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे. देशातील मुली, बहिणींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या घटनेने समाजात फोफावलेल्या या अपप्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच नईम सरदार यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post