माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या कथ्थक पदविका परीक्षेत नगर शहरातील सावेडी येथील कथ्थक नृत्यालयामधील कु. जास्वंदी खैरनार हि विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
कथ्थक नृत्यालयाच्या संचालिका सौ.कल्याणी कामतकर यांच्या शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाखाली प्रारंभिक ते पदविका या परीक्षांमध्ये सर्वच विद्यार्थीनींनी प्रथम श्रेणी पटकावली. या कथ्थक नृत्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
सौ. कल्याणी कामतकर या सुप्रसिद्ध नृत्यगुरू मनिषाताई साठ्ये यांच्या शिष्या असून त्या गेल्या १० वर्षांपासून सावेडी उपनगर आणि नगर शहरामध्ये कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण वर्ग चालवत आहेत. कथ्थक नृत्याची आवड आणि अविरत घेतलेली मेहनत यामुळे विद्यार्थीनी हे सुयश मिळवू शकल्या, असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवलेल्या कु. जास्वंदी खैरनार हिचे कथ्थक नृत्यालयातर्फे आणि सर्वच मार्गदर्शकांतर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
कथ्थक नृत्यालयाचा लागलेला निकाल असा-
कथ्थक पदविका - प्रथम - जास्वंदी खैरनार (विशेष गुणवत्ता प्रथम श्रेणी), उत्कर्षा देशपांडे (विशेष गुणवत्ता प्रथम श्रेणी).
कथ्थक मध्यमा - अनुष्का अलोनी, स्नेहा औताडे, सेजल बागल, सानिया शेंडगे, निधी तिरमल, ऋतुजा वैद्य (सर्व विशेष गुणवत्ता).
कथ्थक प्रगत - शांभवी अंकाराम, कार्तिका अनमल, पूजा भाकरे, वंदना भंडारे, हिलोर भंडारे, सायली बिनीवाले, प्रज्ञा बोज्जा, अंकिता एडके, आश्लेषा गहाणडुले, नूतन क-हाडकर, उत्कर्षा क-हाडकर, तन्वी कोडम, संपदा मुनगेल, पायल मुनोत, वर्षा म्याकल, शर्वरी ओतारी, विशुध्दी पानपाटील, अमृता रच्चा, प्राप्ती शेडाळे, सुवेगा शेडाळे, वैभवी चव्हाण (सर्व प्रथम श्रेणी).
कथ्थक प्रारंभिक - खुशी अकोलकर, नियाश्री अनमल, निष्का अनमल, जान्हवी आठरे, सिध्दी भट, उर्वी भावे, तनिष्का घोडके, तेजाली जोशी, वेदश्री कोयनारे, समिक्षा सिद्दम, मिताली सुर्वे ( सर्व विशेष गुणवत्तेसह प्रथम श्रेणी).
कथ्थक नृत्यालयालयातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन करण्यात आले आहे. नगरमधील विद्यार्थीनी कु. जास्वंदी खैरनार ही कथ्थक नृत्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे सुयश मिळवू शकली, याबद्दल कथ्थक नृत्यालय आणि नृत्यालयाच्या संचालिका सौ. कल्याणी कामतकर यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post a Comment