भारताचा वेस्टइंडीजवर 107 धावांनी विजय


माय अहमदनगर वेब टीम
विशाखापट्टणम्: भारताने विशाखापट्टणम् वनडेत वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कटक येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे.

कुलदीप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा हॅट्ट्रीक करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याने विंडीजच्या शाई होप, जेसन होल्डर आणि अल्जारी जोसेफला बाद केले. कुलदीपने याअगोदर 2017 मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हॅट्ट्रीक घेतली होती. दरम्यान भारताच्या चेतन शर्मा, कपिल देव आणि मोहम्मद शमी यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रीक घेतली आहे.


रोहित-राहुलने मोडला 17 वर्षांचा विक्रम
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी केली. त्यांनी वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांचा 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. सेहवाग-सौरवने 2002 मध्ये वेस्टइंडीज विरोधात राजकोट वनडेमद्ये पहिल्या विकेटसाठी 196 धावांची भागीदारी केली होती. भारताचा वेस्टइंडीजविरोधात हा दुसरी सर्वाधिक धावसंख्या आहे. याअगोदर भारताने 2011 मध्ये वेस्टइंडीजविरूद्ध इंदूर वनडेमध्ये 5 गडी बाद 418 धावा केल्या होत्या. तर भारताने विंडीजविरुद्ध सर्वाधिक तिसरी धावसंख्या 2018 मध्ये मुंबई वनडेमध्ये 5 गडी बाद 377 उभारली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post