उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - प्रभाग क्र. 1 मधील सिध्दिविनायक कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एका श्वानास मागील काही महिन्यांपासून त्वचेचा विकार व जखमा झाल्या आहेत. या श्वानामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. महापौरांच्या प्रभागातील सदर प्रश्न त्यांना सांगून देखील उपाय योजना होत नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सिध्दिविनायक कॉलनीत एका श्वानाला काही महिन्यांपासून त्वचेचा विकार होऊन जखमा झाल्या आहेत. यामुळे सदर श्वान घराच्या परिसरात आला असता त्याची मोठी दुर्गंधी पसरत आहे. तो या घरातून त्या घरापुढे वारंवार बसत असताना, या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक व लतिका पवार यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली होती. मात्र महापालिकेकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. पंधरा दिवसापुर्वी पुण्याहून नगरला आलेल्या लतिका पवार यांच्या मुलास व्हायरल इन्फेकशनमुळे दवाखान्यात अॅडमीट होण्याची वेळ आली. सदर श्वानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.
Post a Comment