माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर कॅन्टोंन्मेंट बोर्ड मार्फत रहिवाशी भागातील नागरीकांना पाणी पुरवण्याची जबाबदारी असताना कॅन्टोंन्मेंट मार्फत भिंगार येथील नागरीकांना गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमीत पाणी पुरवठा केला जातो. कॅन्टोंन्मेंटच्या अधिकाऱ्यांकडुन व प्रशासनाकडुन नागरीकांना याबाबत समाधानकारक उत्तर दिले जात नसल्यामुळे आधीच पाणी टंचाईने त्रस्त् नागरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप् करावा व प्रशासनास योग्य् त्या सुचना द्यावी अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पा. यांनी लोकसभेत शुन्य् प्रहारात बोलतांना केली.
माझ्या अहमदनगर मतदारसंघामध्ये सर्वात मोठा सुरक्षा व सैनिकी दलाचा भाग भिंगार गाव परिसरामध्ये स्थित असून तेथे मोठा रहिवासी भागही आहे. अनेक वर्षांपासून तिथे असलेल्या संरक्षण विभागाद्वारे रहिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून ओढवलेल्या पाणी प्रश्नामुळे संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जाणाऱ्या रहिवाशांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने, माझी सरकारला विनंती आहे की यामध्ये मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा.
अहमदनगर मधील भिंगार येथील रहिवाशी कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या अधिपत्याखाली येतात. तेथे कॅन्टोंन्मेंट बोर्ड व MIDC यांच्या कराराद्वारा पाणी पुरवठा केला जातो. मात्र कॅन्टोंन्मेंट बोर्ड कडुन पाणी गळती, जुनी पापईपलाईन इ. कारणांकडे बोट दाखवुन रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. मुळात पाण्याची एकूण मागणी, त्याची विभागणी व पाणी रेशनिंग बाबत प्रशासनाने संधिग्ता बाळगली आहे. त्यामुळे एकीकडे शहरात महापालीकेकडून शहराला मुळा धरणातुन नियमित पाणी पुरवठा तर दुसरीकडे शहराचाच भाग असणाऱ्या भिंगारमध्ये पाणी-बाणी अशी अभुतपुर्व गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली आहे. हया उपर स्थानिक रहिवाशांना कॅन्टोंन्मेंट प्रश्शसनाकडुन कुठलीच माहिती व्य्वस्थित दिली जात नसल्याची तक्रार दिवसोंदिवस वाढत आहे. नागरीकांचा रोष लक्षात घेता कॅन्टोंन्मेंट हे संरक्षण विभागाच्या अख्यारितीत येत असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी केली.
मागील आठवडयात खा. डॉ. सुजय विखे यांनी भिंगार अर्बन बँक परीसरातील नागरीकांची बैठक घेऊन त्यांचा प्रश्नाबाबत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते.
Post a Comment