केडगावात तलवारीने मर्डरचा प्रयत्न




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जुन्या वादातून टोळक्याने तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला. तसेच घरातील साहित्याची तोडफोड केली. केडगाव येथील मोहिनीनगर परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अशोक मारुती नरवडे, विलास अशोक नरवडे, जम्बो अशोक नरवडे (सर्व रा. दत्त मंदिराशेजारी, मोहिनीनगर, केडगाव) व त्यांचे पाच अनोळखी साथीदार (नाव गाव माहित नाही) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत राजेंद्र पांडुरंग पाचरणे (वय 45, रा. मोहिनीनगर, देवी मंदिराच्या पाठीमागे, केडगाव) हे जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, राजेंद्र पाचारणे हे त्यांच्या घरात असताना अशोक नरवडे व इतरांचे टोळके घरात घुसले. मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न केला. तसेच लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाणीतत पाचरणे हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच टोळक्याने घरातील वस्तू, दुचाकी व दरवाजाची तोडफोड केली.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात राजेंद्र पाचारणे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post