नगर तालुक्यात ६० जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे





माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : नगर तालुका पोलीस ठाण्यात अँट्रॉसिटी अंतर्गत ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील रुई छत्तिशी येथील रविंंद्र अशोक धाडे हे त्यांच्या शेतात पत्नीसह काम करत असताना तेथे पन्नास ते साठ व्यक्तीं आले. शेतात खड्डे खांदण्यास सुरवात केली, तेव्हा धाडे यांनी त्यांना विरोध करुन हे माझ्या मालकीचे शेत असल्याचे सांगितले. तसेच आम्ही दलित लोक माझ्या शेताच्या बाजुच्या सार्वजनिक रस्त्याने ये जा करतो असे सांगितले असता त्या पन्नास ते साठ लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करुन गट नं १ मध्ये अतिक्रमण केले आहे.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रविद्र धाडे यांच्या फिर्यादीवरुन अक्षय रमेश भळगट (रा आकाशवाणी क्रेंद्रासमोर) यांच्यासह पन्नास ते साठ जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post