अनु मलिकसोबत काम कसं करतेय? नेहा कक्करवर भडकली तनुश्री दत्ता




माय नगर वेब टीम
मुंबई - अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषाणाचे आरोप केलेली आणि गेल्या काही दिवसांपासून अदृश्य झालेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मीटू मोहिमेअंतर्गत अनु मलिक यांच्यावर आरोप झालेले असतानाही गायिका नेहा कक्कर  त्यांच्यासोबत काम कशी काय करु शकते? असा सवाल उपस्थित करत तिनं नेहावर टीकास्त्र डागलं आहे.
तनुश्री दत्तानं अलीकडेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं अनु मलिक, गायिका नेहा कक्कर आणि सोनी वाहिनीवर सडकून टीका केली. 'सोनीसारख्या चॅनेलनं असं काहीसं करावं ' याबद्दल मला आश्चर्य वाटतं आहे. सोनी स्वत: ला एक कौटुंबिक वाहिनी म्हणवतं आणि वाहिनीवरील एका शोमध्ये महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणाऱ्या एका पुरुषाला परीक्षक म्हणून काम देतं.'

मानवी मूल्यांपेक्षा चॅनलसाठी त्यांचा टीआरपी अधिक महत्त्वाचा आहे का असा सवालही तिनं उपस्थित केला. 'अनु मलिक यांनी गायिकांसोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल इंडस्ट्रीतील अनेक महिला पुढे येऊन बोलल्या. परंतु, चॅनलनं याची दखलही घेऊ नये इतका त्यांना टीआरपी महत्त्वाचा आहे का? एखादा माणूस काय कर्म करतोय त्यासाठी त्याला जबाबदार धरायला नको का?'
नेहा कक्करला लक्ष्य करत तनुश्री म्हणाली की, 'जेव्हा एका ऑडिशनदरम्यान एका स्पर्धकानं नेहाचं जबरदस्ती चुंबन घेतलं तेव्हा तिला जाणवलं असेल आम्हाला काय त्रास झालाय. मात्र एवढं सगळं घडूनही ती शांतच राहिली. त्या व्यक्तीविरोधात कोणतीही कारवाई करण्यास तिनं नकार दिला. अनु मलिकवरही असे आरोप झाले असूनही तिनं मौन सोडलं नाही उलट त्याच्यासोबत ती अजूनही काम करतेच आहे. अशा व्यक्तीसोबत काम करताना तिला काहीच कसं वाटत नाही' असा सवालही तिनं विचारलाय.
गायिका सोना मोहापात्रा, गायिका नेहा भसीन यांनी मी टू चळवळीत संगीतकार अन्नू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने त्यांना इंडियन आयडॉल हा रिअॅलिटी शो सोडावा लागला होता. अलीकडेच अन्नू मलिक पुन्हा एकदा याच रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post