नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरु, सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं स्वागत, अजित पवारांची घेतली गळाभेट
माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन मंगळवारी सुरु झाले. अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्वात पहिले देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. कोळंबकर सर्व 288 आमदारांना शपथ देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेत सर्व आमदारांचे स्वागत केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाऊ अजित पवार यांची गळाभेट घेतली.यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितले की, "आमची जबाबदारी आता वाढली असून संपूर्ण महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे."
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे राज्यपालांकडे पत्र
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला. शिवसेेनेला पाठिंबा असल्याचे पत्र दाेन्ही काॅंग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांकडे यावेळी सुपूर्दही केले.
Post a Comment