आठवडाभरात राज्यात सत्ता स्थापन होणार; सत्तार यांचा दावा




माय नगर वेब टीम
मुंबई -  येत्या आठवडाभरात राज्यात नवीन सरकार येईल. २५ नोव्हेंबरच्या आसपास नव्या सरकारचा शपथविधी होईल. राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली हे सरकार येईल, यात तिळमात्र शंका नाही, असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी हा दावा केला. सत्तार म्हणाले की, सत्ता स्थापनेची तारिख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र या आठवडाभरात २५ नोव्हेंबरच्या आसपास नवं सरकार राज्यात येईल. तशी माहितीच मला माझ्या सूत्रांनी दिली आहे. आमचंच सरकार येणार आहे. यात तिळमात्र शंका नाही. आमची प्राथमिक बोलणी झाली आहे. अंतिम चर्चा लवकरच होईल.

येत्या शुक्रवारी मुंबईत येण्याचे आदेश 'मातोश्री'तून देण्यात आले आहेत. विधानभवनातूनही तसे आदेश आले आहेत. त्यासाठीच त्यांनी आम्हाला पॅनकार्ड, आधारकार्ड आणि पाच दिवस पुरेल एवढे कपडे आणायला सांगितले आहे. आधार पॅनकार्ड पाहून राज्यपाल ओळख पटवून घेतील. आधारकार्डवरील फोटो आणि आमदार तोच आहे की नाही, याची ते पडताळणी करतील. तसेच राज्यपालांना काही ठिकाणी सह्याही हव्या असतील, त्यासाठी आधार किंवा पॅनकार्डवरील सह्या ते पडताळून पाहतील. त्यामुळेच आम्हाला आधार किंवा पॅनकार्ड सोबत आणायला सांगितले असावे, असंही ते म्हणाले. सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हवलिण्यात येणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला असता 'मातोश्री'वर गेल्यावरच ते कळेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post