आरबीआय प्रशासकांच्या परवानगीने लाख रुपये देखील काढू शकतील ग्राहक, रिझर्व्ह बँकेची हायकोर्टात हमी



माय नगर वेब टीम
मुंबई - बुडित निघालेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात पीएमसीच्या ग्राहकांसाठी आरबीआयने काहीसा दिलासा दिला आहे. आपातकालीन परिस्थितीत या बँकेतील ग्राहक तातडीने मदतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रशाकाकडे धाव घेऊ शकतात. तातडीची वैद्यकीय गरज भागवण्यासाठी अशा ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबई हायकोर्टात मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

पीएमसी बँकेतून आपलेच पैसे काढण्यासाठी ग्राहकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरच दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आरबीआयने हायकोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, लग्न समारंभ, शिक्षण, आयुष्याशी संबंधित इतर महत्वाच्या कामांसाठी पीएमसी बँकेच्या ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी विभागीय खंडपीठाचे न्यायाधीश एस.सी. धर्माधिकारी आणि आर.आय. चगळा यांच्यासमोर सांगितले, की आरबीआयने नेमलेल्या प्रशाकांकडे जाऊन 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास दाद मागितली जाऊ शकते. ही उपाययोजना बँक आणि बँकेचे ग्राहक या दोघांसाठी योग्य आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post