मंगळवारी सत्तास्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक



माय नगर वेब टीम
पुणे – राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी भेट होणार आहे. या भेटीत राज्यातील सत्ताकोंडीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी पुन्हा राज्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र बसून सत्तास्थापनेबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात रविवारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मलिक यांनी ही माहिती दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post