मुंबईत भाजपच्या पराभूत उमेदवारांची बैठक; पंकजा मुंडे अनुपस्थित?




माय नगर वेब टीम
मुंबई -  विधानसभेत भाजपच्या विद्यमान मंत्र्यांसह अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपला अपयश आले. यानंतर राज्यात सत्तासंघर्ष विकोपाला गेला असता भाजपने पराभूत उमेदवारांची आज मुंबईत बैठक बोलावली आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक 105 जागा मिळवूनही भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर आहे. कोणताही पक्ष सत्ता स्थापन न करु शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

मुंबईतील दादरमधील वसंत स्मृती कार्यालयात भाजपच्या तीन दिवसीय बैठका पार पडत आहेत. आज भाजपच्या पराभूत उमेदवारांची बैठकीचाही समावेश आहे.

भारतीय जनता पक्ष आज विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेत आहे. दादरच्या वसंत स्मुर्ती कार्यालयात या बैठीकचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे हे उपस्थित होते.

तर पराभूत झालेल्या उमेदवारात रोहिनी खडसे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, माजी मंत्री अनिल बोंडे, राम शिंदे, राजकुमार बडोले, वैभव पिचड सह इतर उमेदवार उपस्थित होते.

या बैठकीला सुरवात झाली असली तरी पराभूत झालेल्या महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे अद्याप न पोहोचल्याने तर्क वितर्क लढवले जात आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post