मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचा तर नाशिकच्या महापौरपदी भाजपचा विजय
माय नगर वेब टीम
मुंबई/नाशिक - मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची निवड करण्यात आली. महापौर पदाच्या शर्यतीत पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, सोमवारी सायंकाळी शेवटच्या क्षणी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.
मुंबईतील खड्डय़ांचे प्रश्न किंवा विविध कारणांमुळे पक्षावर होणारी टीका, प्रत्येक वेळी तडफेने प्रत्युत्तर देणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना पक्षनेतृत्वाशी एकनिष्ठ राहण्याचे बक्षीस मिळाल्याच्या चर्चा रंगत आहेत.
नाशकात मनसेच्या साथीने भाजपचा महापौर
तर दूसरीकडे नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ दिली. त्याच प्रमाणे भाजपच्या दहाही नगरसेवकांनी बंडखोरी मागे घेऊन भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
Post a Comment