येत्या ५ वर्षामध्ये उपनगरांचा कायापालट होणार
नगरसेविका शोभाताई बोरकर ; प्रभाग क्र.४ मध्ये अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरु
माय नगर वेब टीम
अहमदनगर - जनतेला हवा असलेला शाश्वत असा विकास साध्य करायचा आहे. प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन मुलभूत प्रश्नाबरोबर विकासाचे प्रश्न मार्गी लावणार आहे. आ.संग्राम जगताप यांनी नेहेमीच विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. प्रभाग क्र.४ मध्ये गुलमोहर परिसरातील आनंद नगरमधील अंतर्गत सर्व रस्त्यांची डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली. या कामासाठी आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक निधीतून मंजुर कामे आहे. जनतेला हवा असलेला विकास आम्ही प्रभागामध्ये करणार आहे. पुढील ५ वर्षामध्ये उपनगराचा विकासकामातून कायापालट होणार आहे असे प्रतिपादन नगरसेविका शोभाताई बोरकर यांनी केले.
आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकासनिधीतून प्रभाग क्र.४ मध्ये आनंदनगरमधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरु झाले असून त्याची पाहणी नगरसेविका शोभाताई बोरकर यांनी केली. यावेळी प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, सुमित कुलकर्णी, अमित गटणे आदी उपस्थित होते.
यावेळी अभियंता सुरेश इथापे म्हणाले की, नगर शहरामध्ये दर्जेदार विकासकामे व्हावीत यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही विकासकामांकडे लक्ष दिल्यास कामाचा दर्जा चांगला राहील.
यावेळी सुमित कुलकर्णी म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांनी मागील ५ वर्षामध्ये नगर शहरामध्ये मोठी विकासकामे केली. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे नगर शहरातील जनतेने आ.संग्राम जगताप यांना दुसर्यांदा आमदारपदी विराजमान केले आहे. आम्ही सर्वजण उपनगराच्या विकासासाठी आ.जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम करु. उपनगराच्या विकासाचे नियोजन करुन विकास साधला जाईल. असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षामध्ये उपनगराच्या विकासाचा आराखडा तयार करुन विकासकामे केली जातील. पुढील ५० वर्षाचे नियोजन केले जाणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे विकासकामांना गती आली आहे. आनंदनगर परिसराचा विकास कामातून कायापालट झाला आहे.
Post a Comment