देवेंद्र फडणवीसच नव्हे हे बारा जण ठरले देशभरातील औट घटकेचे मुख्यमंत्री


माय नगर वेब टीम
मुंबई - देवेंद्र फडणवीसांनी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अवघ्या तीन दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा दिला. शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसांत राजीनामा दिल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे नाव औट घटकेच्या मुखमंत्र्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. कर्नाटचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी तर फक्त दोन दिवसांचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. यांसह देशभरातील बारा जण कमी कालावधीचे मुख्यमंत्री ठरले आहेत.
देवेंद्र फडणवीसच नव्हे हे बारा जण ठरले देशभरातील औट घटकेचे मुख्यमंत्री
सतीश प्रसाद सिंह (अंतरिम-बिहार)- 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 1968 (4 दिवस)
बिंदेश्वर प्रसाद (बिहार) 1 फेब्रुवारी ते 2 मार्च 1968 (30 दिवस)
चौ. मोहम्मद कोया (केरळ) 12 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 1979 (50 दिवस)
ओमप्रकाश चौटाला (हरियाणा) 12 जुलै ते 17 जुलै 1990 (5 दिवस)
ओमप्रकाश चौटाला (हरियाणा) 21 मार्च ते 6 एप्रिल 1991 (16 दिवस)
एससी मारक (मेघालय) 27 फेब्रुवारी ते 10 मार्च 1998 (11 दिवस)
जानकी रामचंद्रन (तामिळनाडू) 7 जानेवारी ते 30 जानेवारी 1998 (23 दिवस)
जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 1998 (3 दिवस)
नीतिश कुमार (बिहार) 3 मार्च ते 10 मार्च 2000 (7 दिवस)
बीएस येडियुरप्पा (कर्नाटक) 12 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2007 (7 दिवस)
बीएस येडियुरप्पा (कर्नाटक) 17 मे ते 19 मे 2018 (2 दिवस)
देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र) 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019 (3 दिवस)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post