राहुल द्रविड IPLमधील 'या' गोष्टीवर नाराज




माय अहमदनगर वेब टीम
लखनऊ -  टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय अकादमीचा संचालक राहुल द्रविड  यानं आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांना पुरेशी संधी मिळत नाही असं सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय प्रशिक्षकांना 'सपोर्ट स्टाफ'मध्ये न घेऊन संघ चूक करत आहेत, असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं. भारतीय प्रशिक्षक काही कमी नाहीत, असंही तो म्हणाला.
राहुल द्रविड हा लखनऊमध्ये १९ वर्षांखालील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका पाहण्यासाठी आला आहे. त्यावेळी त्यानं आयपीएलविषयी मत व्यक्त केलं. आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांना फारशी संधी दिली जात नसल्याबद्दल माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक असलेल्या द्रविडनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याकडेही काही उत्तम प्रशिक्षक आहेत असं मला वाटतं. त्यांच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपलं क्रिकेट आणि प्रशिक्षक प्रतिभासंपन्न आहेत, असं द्रविड म्हणाला. आपल्या प्रशिक्षकांचा आत्मविश्वास वाढवण्याची नितांत गरज आहे. आपल्या प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये सहायक प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली जात नाही याचं मला वाईट वाटतं, असंही तो म्हणाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post