बालिकाश्रम रोडवरील फर्निचर दुकानाला भीषण आग



माय नगर वेब टीम
अहमदनगर - बालिकाश्रम रस्त्यावरील न्यू स्टाइल फर्निचर दुकानाला रात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळा परिसरात हॉटेल गजराज शेजारी न्यू स्टाइल फर्निचर नावाचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वीचे दुकान सुरू झालेले आहे. रात्रीच्या वेळी अचानक दुकानाला आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ही आग शॉर्टसर्किटमुळे झाली की कोणी लावली, याबाबत संभ्रम आहे.

आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब व तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फर्निचर दुकान असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत सोफा, दिवाण, शोकेस, झोपाले, कपात यासह सर्व साहित्य जळून खाक झाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post