राज्यस्तरीय समिती घेणार योजनांचा आढावा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - असंघटित कामगारांसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना आणि लघु व्यापाऱ्यांकरिता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या दोन योजना केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठित केली आहे. या समितीकडून दोन्ही योजनांच्या लाभार्थींच्या नोंदणीचा आढावा घेण्यात येणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील नागरी सुविधा केंद्रे व ई-जनसुविधा केंद्राच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे उद्दीष्ट पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेच्या लाभार्थींची पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेमध्ये नोंदणी करणे आदी कामकाज या समितीकडून केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीकडून स्थानिक पातळीवर होत असलेल्या लाभार्थी नोंदणीचा आढावा घेणे, उद्योग विभागामार्फत दुकानदार व लघु व्यापाऱ्यांच्या गटांची नोंदणीसाठी प्रयत्न करणे, असंघटित कामगार व लघु व्यापाऱ्यांकरता स्वतंत्रपणे जिल्हास्तरीय व नागरी सुविधा केंद्र स्तरावर नोंदणी कार्यशाळा आयोजित करणे आदी कामकाज केले जाणार आहे. या दोन्ही समित्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Post a Comment