सौरभ गुंडला राष्ट्रीय सायकलस्पर्धेत कास्यपदक


माय नगर वेब टीम

अहमदनगर - राजस्थान येथील बिकानेर मध्ये झालेल्या २४ व्या राष्ट्रीय रोड अंजिक्यपद सायकलस्पर्धेत केडगाव येथील सौरभ राजेंद्र गुंड याने चमकदार कामगिरी करत कास्यपदक पटकावले.

सौरभ हा महाराष्ट्र सायकल संघातून या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने टीम टाईम ट्रायल या प्रकारामध्ये कास्यपदक पटकावले. यापुर्विहि सौरभ ने राष्ट्रीय व राज्यस्तरावरील अनेक सायकल स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी केली आहे. तो नगरच्या पेमराज सारडा कॉलेजचा विद्यार्थी आहे.-सौरभला महाराष्ट्र सायकल संघटनेचे सचिव प्रा संजय साठे , छत्रपती पुरस्कार विजेते सायकलपटू सतिश झेंडें, रवि करांडे, राष्ट्रीय सायकलपटू निलेश शिंदे, विक्रांत हेल्थ क्लबचे विक्रम टेकाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सौरभच्या यशाबद्दल त्याचे स्नेहालयचे सुवालाल शिंगवी, उद्योजक मधुकर कोतकर, शिवाजी बोरकर, साम्राज्य ग्रुपचे संस्थापक बापूसाहेब सातपुते यांनी अभिनंदन केले .सौरभ हा नगरच्या महापालिकेचे कर्मचारी राजेंद्र गुंड यांचा चिरंजीव आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post