माय नगर वेब टीम
अहमदनगर - काहीही कारण नसताना एकाने दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गाडीच्या चावीला असलेला छोटा चाकू कपाळावर मारून दुखापत केली. तपोवन रस्त्यावर गुंडू साडीजवळ ही घटना घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात राजू धोत्रे (रा. गुंडु साडी जवळ, तपोवन रोड, नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत लक्ष्मण नारायण कुऱ्हाडे (वय 35, रा. गुंडू साडीजवळ, तपोवन रोड, नगर) हे जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, लक्ष्मण कुऱ्हाडे व त्यांची पत्नी घरासमोर असताना काही कारण नसताना धोत्रे यांनी वाईट वाईट शिव्या सुरू केल्या. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गाडीच्या चावी असलेला छोटा चाकू डोळ्यांच्या वरती मारून कपाळावर दुखापत केली. तसेच परत जर आमच्या नादी लागला तर तलवारीने कापून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात राजू धोत्रे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिरसाठ हे करीत आहेत.

Post a Comment