माय नगर वेब टीम
नवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरुद्ध येत्या ६ डिसेंबरपासून होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. भारताचा सलामीवीर शिखर धवन याला मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
शिखर धवन हा सध्या गुडघ्याच्या दुखापतीनं हैराण आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात झेल पकडताना त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला तब्बल २० टाके घालावे लागले आहेत. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं मंगळवारी त्याची फिटनेस टेस्ट केली. धवन पूर्ण बरा होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असं तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांच्या अहवालानंतर त्याला टी-२० मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
Post a Comment