95 लाखांचा अपहार; ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल


माय अहमदनगर वेब टीम
राजूर - अकोले तालुक्यातील आंबेवंगण व शेणीत ग्रामपंचायतीच्या जवळपास 95 लाख रूपयांच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणशिंग यांच्यावर राजूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आंबेवंगण ग्रामपंचायतमध्ये 13/11/2013 ते 21/04/2018 या कालावधीत सरकारी निधीचे धनादेशाद्वारे 18,48,188 रुपयांचा व शेणीत ग्रामपंचायतीच्या 75,69,504 लाख रुपयांचा सरकारी निधीचे 13/11/19 ते 21/4/18 या कालावधीत धनादेशाद्वारे काढून अपहार केल्या प्रकरणी राजूर पोलिसांत अकोले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काशिनाथ धोंडीराम सरोदे वय 51 रा.गुंजाळ मळा तालुका संगमनेर यांनी गुन्हा दाखल केला आहे.

यानुसार गुन्हा रजी नं 202 भा.द.वी.कलम 409 प्रमाणे गुन्हा तसेच कलम 408 प्रमाणे गु.र.नं 203 दाखल केला आहे याप्रमाणे दोन गुन्हे दाखल केले आहे. ग्रामसभा कोष निधी, पाणी पुरवठा खाते अंदाज पत्रकीय मान्यता न घेता नियमबाह्य खर्च तसेच 14 वा वित्त आयोग पेसा या खात्यातून रक्कम काढून अपहार करणे तसेच दप्तर गहाळ करून कायमस्वरूपी अपहार केला यावरून ग्रामसेवक भाऊसाहेब रणसिंग यांच्या वर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post