सियाचीन येथे हिमस्खलन; ४ जवान शहीद
माय नगर वेब टीम
सियाचीन - जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी असलेले सियाचीनयेथे हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील 4 जवान शहीद झाले असून दोन पोर्टर ठार झाले आहेत. तर गस्तीपथकातील 8 जवान दबले गेले आहेत. दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सियाचीनमधील लष्कराच्या चौकीजवळ हे हिमस्खलन झाले असून हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 18 हजार फूट उंचीवर आहे. सियाचीनमधील कारकोरम भागात हिमस्खलन झाले आहे.
याबाबत माहिती मिळताच तातडीने बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून चार जवानांसह दोन पोर्टर असे सहाजण ठार झाले आहेत. तर आठ जवान या ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Post a Comment