तलाठी पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या



माय नगर वेब टीम
कोपरगाव - पत्नीबरोबर नेहमी होत असलेल्या भांडणाच्या कारणावरुन घटस्फोट घेतल्यानंतर घटस्फोटीत पत्नीने तिच्या ताब्यात असलेले पतीचे काही महत्वाची कागदपत्र देण्यासाठी नेहमीच मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने कोपरगाव पोलीस ठाण्यात पत्नीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीष अशोक अभंग याचे चासनळी येथील भिमराव विधाते यांची मुलगी सोनाली हिच्याबरोबर विवाह झाला. सोनाली ही महसुल विभागात तलाठी म्हणून नोकरीस होती. गिरीशष याचे कोपरगाव येथे झेरॉक्स व ऑनलाईन सेंटरचे दुकान होते. परंतु एक वर्षानंतर सोनालीचे वागणे पटत नसल्याच्या कारणावरुन सोनाली व गिरीष यांच्यात नेहमीच भांडणे होत असत. सोनालीच्या वागण्यात बदल झाला नसल्यामुळे एक बैठक घेऊन संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरले.

त्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल करुन घटस्फोटाचा अर्ज मंजूर झाला. सोनालीकडे गिरीष याचे काही महत्वाचे कागदपत्र असल्यामुळे ते कागदपत्र देण्यास तिने टाळाटाळ केली. त्यानंतर तिने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मला सुट्टी आहे. फ्लॅटवर येऊन तुमची कागदपत्रे घेऊन जा, असे सोनालीने सांगितले. 13 ऑक्टोबर रोजी गिरीष हा कागदपत्र घेण्यासाठी चाललो असल्याचे त्याने घरातील लोकांना सांगितले. परंतु सोनालीने वेळोवेळी फोन करुनही ओरिजनल कागदपत्रे दिली नाही. तसेच नंतर फोनही स्विकारले नाही. त्यानंतर गिरीष याच्याशी संपर्क झाला नाही. गिरीषच्या आईला रात्रीदरम्यान कोपरगाव पोलीस ठाण्यातून तुमचा मुलगा आजारी आहे, असा फोन आला. तेव्हा गिरीषचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेले असता गिरीष याने पत्नीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समजले.

गिरीष यास सोनाली विधाते, भिमराव विधाते, संदीप चौरे, दिपाली चौरे, विकास गाडीलकर यांनी वेळोवेळी त्रास दिला म्हणून त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी महेंद्र अशोक अभंग याने कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सोनाली भिमराव विधाते, भिमराव सहादू विधाते, संदीप नाना चौरे, दिपाली संदीप चौरे, विकास गाडीलकर सर्व रा. कोपरगाव यांच्याविरुद्ध भादंवि कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post