शिवसेनेच्या अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या प्रस्तावाचे आठवले कडून समर्थन
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली- भाजप व शिवसेना यांच्यात सत्तास्थापन करण्यावरून चाललेला कलगीतुरा यावर रामदास आठवले यांनी सत्तास्थापनेसाठी नवे समीकरण होणार नसल्याचेही सांगितले आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रस्तावाचा भाजपने गांभीर्याने विचार करावा असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. शिवसेनेच्या अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या प्रस्तावाचे आठवलेंनी समर्थन केले आहे. जनतेने महायुतीला कौल दिला आहे. शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणे महायुतीला अशक्य आहे. त्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करावा, असेही आठवले यांनी पुढे नमूद केले. आठवले प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेना कधीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री हा प्रस्ताव जर मान्य नसेल तर शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि राज्यात दोन-तीन जास्त मंत्रिपदे द्यावी तसेच केंद्रातही जास्तीच मंत्रिपद द्यावं व हा तीढा सोडवावा असा सल्लाही यावेळी आठवलेंनी दिला. सत्तास्थापनेबाबत महायुतीने 4-5 दिवसांत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही आठवलेंनी म्हटले आहे.

Post a Comment