विधानसभा 2019 / विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या सर्वाधिक सभा, येथे जाणून घ्या कोणी किती सभा घेतल्या




माय नगर वेब टीम
मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. आचारसंहितेच्या नियमांनुसार आता कोणालाही जाहीर प्रचार करता येणार नाही. उमेदवारी अर्ज माघारीनंतर अवघे 12 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळाले होते. या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सभांचा धडाका लावला होता.

भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींनी प्रचारसभा घेतल्या. काँग्रेसच्या वतीने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्वाधिक सभा घेऊन वातावरण ढवळून काढले, तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावरच या नवीन पक्षाच्या प्रचाराची धुरा होती. मनसेच्या वतीने एकमेव राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्या.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्या नेत्यांनी किती सभा घेतल्या ?

> राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 57 तर जयंत पाटील यांनी 40 सभा घेतल्या.
काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खर्गे, शत्रुघ्न सिन्हा, छत्तीसगड आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतल्या.

> राहुल गांधी 5सभा
> बाळासाहेब थोरात 58सभा
> मल्लिकार्जुन खर्गे 13सभा
> छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल 12सभा
> राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत 5सभा
> सचिन पायलट 4सभा
> ज्योतिरादित्य सिंधिया 5सभा
> मुकुल वासनिक 28सभा
> अशोक चव्हाण 15सभा
> राजीव सातव 12सभा
> हुसेन दलवाई 16सभा
> सचिन सावंत 15सभा
> शत्रुघ्न सिन्हा 5सभा
> वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर, नामदेव जाधव, अण्णाराव पाटील यांच्यासह इतरांनी सभ्या घेतल्या.
> प्रकाश आंबेडकर 50सभा
> नामदेव जाधव 4सभा
> अण्णाराव पाटील 15सभा
> अंजली मायदेव 7सभा
> सुजाता आंबेडकर 5सभा

मनसेच्या वतीने राज ठाकरे यांनी 10 सभा घेतल्या असल्याचे मनसे प्रवक्त्यांनी सांगितले

महायुतीच्या वतीने पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सभा घेतल्या तर अनेक नेत्यांच्या सुमारे 45 पत्रकारपरिषद झाल्या.
> पंतप्रधान नरेंद्र मोदी: 9 सभा
> भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह : 10 सभा
> कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डाजी : 7 सभा
> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : 65 सभा
> राजनाथ सिंह : 3 सभा
> नितीन गडकरी : 35 सभा
> उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : 10 सभा
> कर्नाटक मुख्यमंत्री येदियुरप्पा : 8 सभा
> गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी : 4 सभा
> चंद्रकांत पाटील : 10 सभा
> स्मृति इराणी : 14 सभा
> पंकजा मुंडे : 18 सभा
> रावसाहेब दानवे : 11 सभा
> साध्वी निरंजन ज्योती : 6 सभा
> फग्गनसिंग कुलस्ते : 4 सभा
> केशवप्रसाद मौर्य : 3 सभा
> सुधीर मुनगंटीवार : 6 सभा
> मनोज तिवारी : 8 सभा
> जी. किशन रेड्डी : 3 सभा
> गुलाबचंद कटारिया : 9 सभा
> रामदास आठवले : 5 सभा
> शाहनवाज हुसेन : 4 सभा
> चित्रा वाघ : 16 सभा
> नाहीदा शेख : 9 सभा
> अनेक नेत्यांच्या सुमारे 45 पत्रकार परीषद
शिवसेना जाहीर सभा
> उद्धव ठाकरे - 50सभा
> आदित्य ठाकरे - 50सभा

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post