इराकमध्ये आंदोलनात ३४ ठार


बगदाद – इराकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधी निदर्शने सुरू आहेत. मागील तीन दिवसात झालेल्या निदर्शनांमध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला आहे तर, दीड हजारांपेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. देशाच्या दक्षिण भागातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल महदी यांच्या कमकुवत सरकार विरोधात देशामध्ये आंदोलन पेटले आहे. बेरोजगारी, सरकारी सुविधांचा अभाव आणि भ्रष्टाचार सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरुन इराकचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामध्ये ठार झालेल्या ३४ जणांमध्ये ३ सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर ४२३ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. अशी माहिती मानवी हक्क आयोगाच्या सदस्याने दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post