औरंगाबाद : ‘एमआयएम’ – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी



माय नगर वेब टीम
औरंगाबाद - राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली, या दरम्यान अनेक ठिकाणी हाणामारीसह मतदान प्रक्रियेला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्याचे समोर आले. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातही असाच प्रकार घडला. एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, असल्याची माहिती समोर आली आहे. तर, खासदार इम्तियाज जलील यांना देखील धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दुपारी कटकट गेट परिसरात वाद झाला व त्याचे पर्यवसन कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झाले. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र परिसरात तणावाचे वातावरण दिसत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post