कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
माय नगर वेब टीम
पारनेर- सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी संतोष साबाजी थोरात (वय ३८) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दुष्काळाने होरपळून जात असताना शेतमालाला हमीभाव मिळत नाही. सततची नापिकी यामुळे संतोष थोरात अनेक दिवसांपासून नैराशेत होते. शेतीमालाला भांडवल म्हणून व घरखर्च भागवण्यासाठी थोरात यांनी पतसंस्थेचे कर्ज घेतले होते. आर्थिक विवंचनेत असल्यामुळे त्यांनी शुक्रवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी पारनेर येथे नेण्यात आले परंतु त्यापूर्वीच ते मृत झाल्याचे घोषित केले. शेतीमालाला हमीभाव न मिळाल्याने व नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुले, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post a Comment