नगरकरांनो दिशाभूल करणाऱ्या व पोळी भाजणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध रहा - बाबासाहेब गाडळकर
माय नगर वेब टीम
अहमदनगर - माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या आवाहनावरुन त्यांच्या वैचारिक पातळीची कीव करावीशी वाटते. ज्या कुटुंबाला एक वैचारिक वारसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून लाभला. तो वैचारिक वारसा धूळीस मिळविण्याचे काम त्यांनी आर्थिक फायद्यासाठी सुरु केले आहे. त्यांनी स्वतःची निष्ठा विकली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी पलटवार केला आहे.
माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे पत्रक वाचले असता त्यांच्या वैचारिक पातळीची किव करावीशी वाटते. ज्या कुटुंबाला एका वैचारिक वारसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून लाभला. त्या वैचारिक वारश्याला धूळीस मिळविण्याचे काम त्यांनी फक्त आर्थिक फायद्यासाठीच सुरु केले आहे. व त्यांनी स्वतःची निष्ठा विकली आहे. ज्या मानसाला महानगरपालिकेत महापौर असताना महानगरपालिकेचे नगरसेवक व महापौर असताना त्यांचे कामे काय असतात हे समजले नाही. आपण नगरसेवक या पदाला उभे राहण्यासही पात्र नाही. अशी आपली राजकीय कारकीर्द. असा आपला आत्मविश्वास. त्यामुळे आपल्या सारख्याच्या तोंडून असे प्रबोधनकारक पत्र पाहिल्यास खरच आपल्या बुध्दीची किव करावीशी वाटते. अहमदनगरमध्ये अजून एक आमच्या नेत्याच्या नावावर राजकीय पोळी भाजणारा नवीन पुरन पोळीमामा उदयास आला हे निदर्शनास येत आहे असल्याचे सांगत खरपूस समाचार घेतला. विरोधकांचे खटाटोप हे नगरकर जाणून असून नगरकर भूलथापाला बळी पडणार नसल्याचे गाडळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment