‘या’ चार आमदारांनी दिला शिवसेनेला पाठिंबा


माय नगर वेब टीम
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. रविवारी बच्चू कडूंच्या ‘प्रहार जनशक्ती’ने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. आतापर्यंत शिवसेनेला चार आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये बच्चू कडूंच्या ‘प्रहार जनशक्ती’चे दोन आणि दोन अपक्ष आमदारांचा सहभाग आहे.त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 60 वर पोहोचले आहे.


प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी पाठिंब्याचे पत्रच उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. बच्चू कडू हे अचलपूरचे आमदार तर राजकुमार पटेल हे मेळघाटचे आमदार आहेत. अचलपूर आणि मेळघाट या मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच दिव्यांग आणि आदिवासी आणि शेतकरी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी, करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post