विरोधी उमेदवाराकडून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न ; राष्ट्रवादीचे पोलिस प्रशासनाला निवेदन




माय नगर वेब टीम
अहमदनगर - विधानसभेच्या निवडणूकिचे वातवरण जोरदार तापू लागले आहे. अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार, पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनानं कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.

या संदर्भात प्रा.विधाते, बाबासाहेब गाडळकर, अरविंद शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

पोलीस प्रशासनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहरात  विधानसभेच्या निवडणूकीची प्रकिया सुरू आहे. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार, कार्यकर्ते व पदाधिकारी जाणीवपूर्वक कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. जाणीवपूर्वक एखादी घटना घडवून त्याचे राजकीय भांडवल करण्यात पटईत आहेत. ते अनेक घटनेतून सिद्ध झाले आहे. मागील मनपा निवडणुकीत शिवसेनेच्या काही तडीपार व गुडप्रवत्तींच्या पदाधिकाऱ्यांनी सारसनगर भागात रिक्षा रात्रीच्या वेळी जाळून त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नगर शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विधाते यांनी निवेदनातून केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post